दैनंदिन धान्य खरेदी विक्री चे व्यवहार चेक करून आलेल्या बिलांची नोंद घेणे, सेव वसुली करणे, लिलाव करणे. दैनंदिन बाजार भाव काढुन महाराष्ट्र राज्य कृषि, पणन मंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे, वार्षिक बाजार भाव भरणे. धान्य विभागात शेतक-यांन मार्फत येणा-या शेतमालाचे विक्री ही खुल्या लिलाव पध्दतीने करण्यात येते. सदर लिलाव हा परवानाधारक खरेदीदार, अडते व शेतकरी यांचा समोर होते. परवानाधारक मापा-यां कडुन शेतमालाचे अचुक मोजमाप करण्यात येते. बाजार समितीने नेमलेल्या कर्मचा-यां मार्फत सदर लिलावाची सौदा पट्टया देण्यात येते. शेतक-यांना त्याचे शेतमालाची रक्कम अडत्यां कडून मिळते.